काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील दिग्गज नेते अडचणीत

 काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवर परिणाम

Updated: Sep 28, 2020, 12:21 PM IST
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातील दिग्गज नेते अडचणीत  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवरही होण्याची शक्यता आहे. गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एक. के. पाटील मुंबईत होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबर बैठकीही घेतली.

इतर नेते अडचणीत

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान कृषी कायद्याचा विरोध करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होते. 

या शिष्टमंडळात अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेते जाणार होते. मात्र एच. के. पाटील यांच्यासोबत गुरुवारी असलेले नेते वगळून इतर नेते आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे.