भाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल

 Rahul Gandhi: काँग्रेसच्या "है तयार हम" महारॅलीच्या निमित्ताने राहुल गांधी हे आज नागपुरात आले होते. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.   

Updated: Dec 28, 2023, 05:26 PM IST
भाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल title=
Congress foundation Day Rahul Gandhi Attack on BJP Said BJP Leading Country Towards Slavery News in Marathi

Rahul Gandhi: काँग्रेसच्या स्थापनादिनी नागपुरात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशात आज विचार आणि सत्ता यांच्यात लढाई आहे. देशात आज दोन विचारसरणींचा लढा चालू आहे, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, भाजपमध्ये राजा-महाराजांची विचारसरणी आहे. इथे वरुन आलेल्या आदेशाचे पालन केले जाते. मात्र, काँग्रेसमध्ये सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. देशाचे सूत्र हे हिदुस्तानातील जनतेच्या हातात असले पाहिजेत, अशी आमची विचारसरणी आहे. आम्ही जनशक्तीबद्दल बोलतोय. तुम्ही काँग्रेसने आणलेले कायदे बघा. स्वातंत्र्याचे युद्ध जनतेने लढले होते. राजा-महाराजांनी नाही. काँग्रेसने नेहमीच गरीब जनतेसाठी युद्ध केले. देशातील जनतेकडे, महिलांकडे कोणतेच अधिकार नाहीयेत. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. आम्ही तीच बदलली होती. पण भाजपला पुन्हा देशाला त्याच गुलामगिरीच्या काळात घेऊन जायचे आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं आहे की, आज देशातील सगळ्यात महत्त्वाच्या संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. आज सर्व व्हॉइस चान्सलर एकाच संघटनेशी संबंधित आहेत. देशातील व्हॉइल चान्सलर मेरिटच्या आधारे निवडले जात नाहीत, असं म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसने केलेल्या कार्याचाही उल्लेख केला आहे. काँग्रेसने श्वेत क्रांती आणली. श्वेत क्रांतीची सुरुवात देशातील नारीशक्तीने केली. हरित क्रांती देशातील शेतकऱ्यांनी केली. तर, औद्यागिक क्रांती देशातील तरुणांनी केली. काँग्रेसने देशाला ध्येय दिले. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत देशाला काय दिलं. गेल्या 40 वर्षांतील सगळ्यात जास्त बेरोगजगारी आज दिसतेय. देशातील कोट्यवधी तरुणांची शक्ती बेकार होताना दिसतेय. आज देशातील तरुणांना नोकरी नाहीये. तर 7-8 तास ते मोबाइलवर इन्स्टाग्राम व फेसबुक पाहताना दिसताहेत, असा निशाणा राहुल यांनी भाजपवर साधला. 

'आदेश आले की ते मानावे लागतात'

राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं होतं की, काँग्रेसमधून भाजपात गेलेले एक खासदार आपल्याला भेटायला आल्याचं गांधींनी म्हटलं आहे. काही दिवस आधी भाजपचे एक खासदार मला लोकसभेत भेटले. ते लपून मला भेटले आणि म्हणाले की राहुलजी मला तुमच्याशी बोलायचे आहे. मी म्हटलं आता काय बोलायचंय तुम्ही तर भाजपात आहात. मी विचारलं सगळं ठिक आहे ना? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, नाही, राहुलजी, भाजपमध्ये राहुन आता हे सहन होत नाही. मी भाजपामध्ये आहे खरा. पण माझं मन मात्र काँग्रेसमध्ये आहे, असा गौप्यस्फोट राहुल गांधींनी केला आहे.