Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद

 चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं.  

Updated: Dec 9, 2022, 06:54 PM IST
Chandrakant Patil :  चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद title=

संभाजीनगर : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संभाजीनगरात (Sambhajinagar) वातावरण तापलंय.' मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद', अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत. पाटील यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं. पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. (congress follwers are agressive after chandrakant patil controversial statment on ambedkar phule and karmveer patil at aurangabad)

पाटील काय म्हणाले?  

"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते.  10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचा या वक्तव्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

"भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली.कर्मवीर भाऊराव पाटील, म.फुले , बाबासाहेबानी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करुन  महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व  महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध", अशा शब्दात अमोल मिटकरी यांना आपला संताप व्यक्त केलाय. 

"दादांच्या विधानाचा जाहीर निषेध"

छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या सर्वच महापुरुषांचा अवमान कुणीही करु नये म्हणूनच काल मी संसदेत महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं धारिष्ट कोणी करणार नाही", असं खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट केलंय.