काँग्रेसची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका, 'राज्यपाल भाजपपाल'

Congress criticized on Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Updated: Mar 15, 2022, 08:45 PM IST
काँग्रेसची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका, 'राज्यपाल भाजपपाल' title=

मुंबई : Congress criticized on Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. राज्यपाल भाजपपाल झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यपाल हे भाजपचे ऐकून हे सर्व करत आहेत, असे ते म्हणाले. 

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानेफेटाळल्यानंतर आता निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही. परंतु आता सर्वाच्च न्यायालयात अजून ज्या याचिकेवर काहीच सुरू झालेले नाही. त्याचा आधार घेवून निवडणूक न घेणे हे योग्य नाही. परंतु आम्ही पुढच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असा नाना पटोले म्हणाले. यासाठी कायदेशीरपणे वेगळा मार्ग काय काढता येईल ते पाहत आहोत
. मुख्यमंत्री याबाबतीत अजिबात हतबल नाहीत, असे ते म्हणाले.

राज्यपाल मंजुरी देत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूक होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री आज विधिमंडळात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले आणि काँग्रेसचे आमदार भेटायला गेले. त्या भेटीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक व्हावी, ही मागणी काँग्रेस आमदारांनी केली. पण मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून तीन वेळा शिष्टमंडळ भेटले. निवडणूक प्रस्ताव दिला पण राज्यपालांनी मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या ही अधिवेशनात विधान सभा अध्यक्ष निवडणूक होणाऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.