पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सुरु असलेली जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० मतदारसंघात कोण लढणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समविचारी पक्षांशी चर्चा करून ४० जागांचे वाटप निश्चित केलेय. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आमची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात ते आमच्यासोबत येतील किंवा नाही, याचा निर्णय होईल. उर्वरित ८ जागांवर अजूनही चर्चा सुरु आहे. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
पुण्याच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला, कॉंग्रेसला जागा राखण्यात यश
आजपर्यंत जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ कायमच काँग्रेसच्या वाट्याला आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने यंदा शरद पवार यांनी पुण्यातून लढण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. मात्र, शरद पवार यांनी आपण यंदा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते.
विनायक मेटेंचा 'शिवसंग्राम' भाजपपासून विभक्त ?
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या जागेवरील हक्क सोडला, अशी चर्चा कालपासून सुरु होती. मात्र, अजित पवार यांनी हा दावा फेटाळून लावला. निर्णय न होऊ शकलेल्या मतदारसंघांमध्ये पुण्याचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत समविचारी पक्षांना एकत्र घेऊन पुढे जाण्यावरच आमचा भर असेल. मात्र, घटकपक्षांनी आपला उमेदवार निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.