पारा घसरल्याने राज्यात हुडहुडी, या भागात थंडीची लाट

Weather in Maharashtra : उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. 

Updated: Dec 21, 2021, 01:03 PM IST
पारा घसरल्याने राज्यात हुडहुडी, या भागात थंडीची लाट  title=
संग्रहित छाया

मुंबई : Weather in Maharashtra : उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. विदर्भात थंटीची लाट आली आहे. (cold wave in Vidarbha)

राज्यातील तापमानात घट झाल्याने गारव्यात वाढ झाली आहे. बहुतेक भागातील तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. विदर्भात अंगाला झोंबणारा गारवा आहे. 22 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात घट होऊन गारव्यात वाढ झाली आहे. विदर्भात थंडीची लाट आली असून, बहुतेक भागातील तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली. 

विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते सहा अंशांनी कमी झाला असल्याने गुलाबी थंडीची चाहूल दिसून येत आहे. थंडीची ही लाट आणखी एक दिवस कायम राहणार आहे. 

उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत तापमानाचा पारा 10 अंशांखाली गेला आहे. 22२ डिसेंबरपासून राज्यात सर्वच ठिकाणी तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.