Cng Png Rate : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, सर्वसामांन्यांना मोठा झटका

सीएनजी आणि पीएनचजीच्या (Cng Png Rate) दरात वाढ करण्यात आली आहे.  

Updated: Oct 3, 2022, 08:08 PM IST
Cng Png Rate : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, सर्वसामांन्यांना मोठा झटका title=

पुणे : सर्वसामांन्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सीएनजी आणि पीएनचजीच्या (Cng Png Rate) दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचा वापर हा वाहनांमध्ये इंधन म्हणून केला जातो. तर पीएनजीद्वारे घराघरात गॅसपुरवठा केला जातो. आता सीएनजी पीएनजीचे दर वाढल्याने आता झटका लागला आहे. सीएनजी आणि पीएनजीची ही दरवाढ (Cng Png Rate  Incresed In Pune)  पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात झाली आहे. (cng png rate incresed in pune and pimpari chinchwad know latetst rate)

सीएनजी-पीएनजीत किती रुपयांना महाग?

सीएनजीचे दर 4 तर पीएनजीचे दर 3 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे पुण्यात 87 रुपयांना मिळणारा सीएनजी आता 91 रुपयांवर गेलाय. तर पीएनजीचे दर 49 रुपये 50 पैशांवरुन 52 रुपये  50 पैशांवर गेलेत. सीएनजी गॅसची मागणी वाढतेय. पण स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात सतत वाढ होतेय. 

पुण्यात 1 एप्रिल 2022 ला सीएनजीचा दर 62.20 रुपये होता. त्यात सातत्यानं वाढ होतेय. एप्रिलपासून सीएनजीच्या दरात 29 रुपयांनी वाढ झाली आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.