मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला. यावेळी या विमानतळासाठी जागा देणा-या भूमीपूत्रांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
डिसेंबर 2019 पर्यंत या विमानतळावरून पहिलं विमान नक्की उडेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.. कोस्टल रोड तसंच मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी 40 हजार कोटींची मदत केंद्राकडून मिळाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
त्या आधारे येत्या काळात आम्ही अनेक पायाभूत प्रकल्पांची उभारणी करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तर या विमानतळाला राज्यातील अनेक शहरांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असेल त्यासाठी जलमार्गाचाही वापर करण्यात येईल असा मानस केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला.