नागपूर : वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना अखेर क्लीन चिट देण्यात आलीय. त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे.
समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना मोपलवार यांनी कथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यामुळं त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
3 ऑगस्ट ते 25 डिसेंबर या कालावधीत ते सक्तीच्या रजेवर होते. मात्र त्या ऑडिओ क्लीपमधील आवाज मोपलवार यांचा नसल्याचं फॉरेन्सिक चाचणीत स्पष्ट झालं होतं.
त्यामुळं आता त्यांना क्लीन चिट देण्यात आली असून, मोपलवार यांची राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून फेरनियुक्ती करण्यात आलीय.