नवी मुंबईत न्हावा बेट होणार नवा पिकनिक स्पॉट, सिडको करणार विकसित

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नवी मुंबईत न्हावा बेटावर नवा पिकनिक स्पॉट तयार करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. 

Updated: Jun 29, 2021, 07:26 AM IST
नवी मुंबईत न्हावा बेट होणार नवा पिकनिक स्पॉट, सिडको करणार विकसित   title=

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नवी मुंबईत न्हावा बेटावर नवा पिकनिक स्पॉट तयार करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. या नव्या पिकनिक स्पॉटमुळे या ठिकाणी पर्यटक आकर्षित होतील. ( Nhava Island in Navi Mumbai) न्हावा येथे ऐतिहासिक एलिफंटा बेटाच्या ( Historic Elephanta Island) कडेला असणारी तीन बाजुंची आणि करंजडे आणि ठाणे खाडी लगत असलेली सुमारे 60 हेक्टर जमीन नवी मुंबईतील सिडकोने आपल्या ताब्यात घेतली आहे, असे वृत्त पिटीआयने दिले आहे.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) नवी मुंबईतील न्हावा बेटाच्या विकासासाठी एक्सप्रेसशन ऑफ इंटरेस्टला (Expression of Interest (EoI) ) आमंत्रित केले आहे. ऐतिहासिक एलिफंटा बेटाच्याकडेला तीन बाजूंनी करंजडे आणि ठाणे खाडी असलेल्या द्वीपकल्प असलेल्या न्हावामधील सुमारे 60 हेक्टर जमीन ताब्यात असल्याचे सिडकोने म्हटले आहे. न्हावा बेटाचे स्थान मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या अगदी जवळ आहे. जे मुंबई आणि न्हावा यांना शिवडी जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर सी-लिंकच्या अगदी जवळ असल्याने याला अधिक महत्व प्राप्त होणार आहे.

नवी मुंबई विकास आराखड्यानुसार हे क्षेत्र प्रादेशिक पार्क झोनमध्ये (आरपीझेड) येते. 60 हेक्टर क्षेत्रापैकी 30 हेक्टर जमीन कोस्टल रेग्युलेटरी झोन ​​(सीआरझेड) अंतर्गत येते. महाराष्ट्र सरकारच्या नगररचना एजन्सीचे मत आहे की, संपूर्ण लँड पार्सल पर्यटन, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी वापरता येईल आणि सहलीचे ठिकाण म्हणून विकसित केले जाऊ शकेल.

या ठिकाणाच्या विकासासाठी सिडकोने एक्सप्रेसशन ऑफ इंटरेस्टकडे अर्ज मागविले असून ते दोन जुलैपर्यंत सादर करावे, लागणार आहे. नवी मुंबई हे शहर सिडकोने नियोजनपद्धतीने वसविले आहे. या नवी मुंबईत 14 नोड्स विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे नवा पिकनिक स्पॉटमुळे नवी मुंबईचे महत्व अधिक वाढणार आहे. सध्या नवी मुंबईतील उलवे आणि द्रोणागिरी दरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहत आहे. तसेच पुष्पक, पनवेल, उलवे आणि द्रोणागिरी यांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे.