Chitra wagh: उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार; चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या!

urfi javed controvasy :कपड्यांमुळे अॅलर्जी (Allergies) होते, त्यामुळे मी कमी कपडे घालते, असं उर्फी जावेद म्हणाली होती. त्यावर चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उपाय शोधला आहे. 

Updated: Jan 7, 2023, 09:29 PM IST
Chitra wagh: उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार; चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या! title=
chitra wagh,urfi javed

Chitra wagh vs Urfi javed: भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) आणि राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यात उर्फीवरून (Urfi javed) सुरू झालेला कलगीतुरा थांबायला तयार नाही. चाकणकर म्हणजे महिला आयोग (State Women's Commission) नव्हे, अशी टीका करत आयोगाच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने नोटीस पाठवली होता का?, असा सवाल वाघ यांनी केलाय. त्यावेळी त्यांनी उर्फी जावेदला पुन्हा खडेबोल (Chitra wagh On Urfi javed) सुनावले आहेत. त्यामुळे वाद अद्याप संपला नसल्याचं पहायला मिळतंय. (chitra wagh say i will slap urfi javed marathi news)

मी आजही सांगते, उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. मात्र थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगा नाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ (Chitra wagh Press Conference) यांनी घेतली आहे. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदला पुन्हा झापलं. त्यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

महिला आयोगाने चित्र वाघ यांना नोटीस (Notice) बजावली होती. महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत खडेबोल सुनावले. महिला आयोग म्हणजे रुपाली चाकणकर नाहीत. त्यांनी मला नोटीस पाठवलीये, अशा 56 नोटीसा मला रोज येतात. नोटीस पाठवताना आयोगाच्या सदस्यांची मंजुरी घेतली का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी चाकणकरांना विचारला आहे.

आणखी वाचा - Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"

दरम्यान, कपड्यांमुळे अॅलर्जी (Allergies) होते, त्यामुळे मी कमी कपडे घालते, असं उर्फी जावेद म्हणाली होती. त्यावर चित्रा वाघ यांनी उपाय शोधला आहे. उर्फीला (Urfi javed) देण्यासाठी आमच्याकडे अॅलर्जीच्या गोळ्या आहेत, असं चित्रा वाघ म्हणतात. त्यामुळे आता उर्फीच्या फॅशन स्टाईलमुळे सुरू झालेला हा वाद कधी शांत होणार?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.