पूरग्रस्त भाग दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात हाहाकार माजला. (Heavy rains in Maharashtra) कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुराने सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे. 

Updated: Jul 30, 2021, 02:38 PM IST
पूरग्रस्त भाग दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा title=
संग्रहित छाया

मुंबई /कोल्हापूर : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात हाहाकार माजला. (Heavy rains in Maharashtra) कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुराने सर्वाधिक मोठे नुकसान झाले आहे. पूरओसरल्यानंतर (Flood) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला आहे. या दौऱ्याच्यावेळी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिला.

 राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला. तर काही ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडल्या. तर दरड कोसळ्याने अनेकांचे बळी गेलेत. मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. कोल्हापुरात 2019नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. (Chief Minister Uddhav Thackeray Visits Flood Affected Kolhapur Says Action In Encroachment In Rivers)

राज्यातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य केले. पूरस्थिचीच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे ते म्हणालेे. कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्यामागे एक कारण हे नदीपात्रातील अतिक्रमण देखील आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.

 मुख्यमंत्री म्हणाले, काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणे शक्य आहे, ते आपण करु शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यापुढे आता बांधकामे करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारुच नका. मग जे व्हायचे, ते होऊ द्या. पण असे आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरुपी इलाज करणे हे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.

आताची परिस्थिती पुन्हा उद्धभवू नये म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.  कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचं पुनर्वसन करणे ही बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचंही पुनर्वसन करावे लागणार आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोसळेले संकट मोठे

राज्यातील पुराचे भीषण वास्तव पाहिलेले आहे. या कामाला गती दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी कोसळलेले संकट मोठे आहे, काही ठिकाणी दरडींखाली आपलेच माता-भगिनी गाडले गेले आहेत. हे सगळे अकरित घडायला लागले आहे. या संकटातून बाहेर पडताना जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असते. त्यासोबतच कोविड पसरु नये आणि पाणी साचल्यानंतर येऊ शकणारे रोग येऊ नये यासाठी प्रयत्न करणे, मलबा साफसफाई करणे, तिथल्या लोकांना उभं करणे हे सगळे करणे महत्वाचे आहे.