Shiv Jayanti 2023: येत्या 19 फेब्रुवारीला आपण सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती साजरी करणार आहोत. आपल्या सर्वांसाठीच छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj Jayanti 2023) यांचे व्यक्तिमत्त्व एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. शाळा आणि कॉलेजमध्येही शिवरायांचे महत्त्व लहान लहान मुलांना पटवून दिले जाते. शिवजयंतीच्या निमित्ताने शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तेव्हा शिवरायांबद्दल विद्यार्थी हे अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विविध कार्यक्रमांमध्ये (Chhtrapati Shivaji Maharaj Speech) भाषण सादर करतात. महाविद्यालयांमध्येही अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाषण कसे लिहू शकता. खासकरून विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक आहेत. शिवनेरी किल्ल्यावर शिवरांयाचा जन्म झाला. शिवरायांचे व्यक्तिमत्त्व हे आजही प्रत्येक मराठी मनाला मोहित करते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले हे मोठे जहागीरदार होते. विजापूर इथल्या महाराजांचे ते प्रमुख होते. शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ (Rajamta Jijau) यांनी महाराजांना घडविले. शिवरायांच्या चरित्र निर्माणात त्यांच्या आई जिजाबाई यांचे विशेष असे योगदान आहे.
शिवरायांचा जन्म झाला तेव्हा भारतात जुलमी अशा मुघलांचे राज्य होते. मुघलांचा क्रुर राजा औरंगजेब शिवरायांच्या काळात दिल्लीच्या गादीवर होता. मुघलांनी हिंदूंवर बेछूट अत्याचार करायला त्यावेळी सुरूवात केली होती. त्यांचा अत्याचार आणि त्यांचा मानवता विरोधी क्रुरपणा हा दिवसेंदिवस वाढतच होता. आपल्याच जन्मभुमीत, आपल्याच लोकांवर आणि महिलांवर होणारे अत्याचार पाहून शिवराय हा अन्याय सहन करणारे नव्हते. जुलमी अगांतुकांच्या तावडीतून आपल्या देशवायिसांना मुक्त करायचे हाच त्यांची निर्धार होता आणि लोकांच्या कल्याणासाठी दिवसरात्र, एक एक क्षण कार्यरत राहून त्यांची सेवा करण्यात छत्रपती शिवाजी महाराज कुठेही कमी पडले नाहीत.
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्वराज्याची संकल्पना त्यांनी राबवायला सुरूवात केली. त्यांनी त्याच वयात अनेक छोटे किल्ले आणि प्रदेश जिंकून घेतले. आपल्या शौर्यानं आणि चातुर्यांनं मुघलांच्या सैन्याला हरवत आपल्या पदरी त्यांनी न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त केले. त्यांना त्यांच्या यशात साथ देणारी अशी जीवाला जीव ओवाळून टाकणारी माणसं भेटली. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर अशा अनेक शुरवारांनी आणि शिवरायांच्या शिलेदारांना त्यांना मरेपर्यंत स्वराज्यासाठी साथ दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले आणि हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना केली. अफजल खान, औंरगजेब, शाइस्तखानसारख्या जीवाशी आलेल्या शत्रूंनाही त्यांनी नेस्तनाभूत केले. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक (Chhtrapati Shivaji Maharaj Coronation) करण्यात आला. इतक्या वर्षांच्या गुलामगिरीतून आणि जुलूमातून गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपानं मिळाला.