पोलीस दलातल्या पूजा पारखी सोशल मीडियात सुपरहिट

आता बातमी खाकी वर्दीतल्या एका गोड गळ्याची.....चंद्रपूर पोलीस दलातल्या पूजा पारखी या पोलीस शिपाई महिलेचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.....पाहुया पूजा का सुपरहिट ठरतेय.... 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 5, 2018, 06:17 PM IST
पोलीस दलातल्या पूजा पारखी सोशल मीडियात सुपरहिट title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : आता बातमी खाकी वर्दीतल्या एका गोड गळ्याची.....चंद्रपूर पोलीस दलातल्या पूजा पारखी या पोलीस शिपाई महिलेचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.....पाहुया पूजा का सुपरहिट ठरतेय.... 

सोशल मीडियावर धुमाकूळ

खाकी वर्दीतल्या गोड गळ्याची ही पोलीस शिपाई पूजा पारखी-जाधव..... चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयात सध्या कार्यरत आहेत.... आजोबा आणि वडिलांकडून गाण्याचा वारसा मिळाला.... मग पूजानं गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं... आणि गाणी युट्यूबवर पोस्ट करायला सुरुवात केली... आणि बघता बघता त्याला लाखो लाईक्स मिळाले..... 

तणाव घालवण्याचा मार्ग

पोलीस दलातलं काम म्हणजे तसं तणावाचं.....जबाबदारीचं... जिकीरीचं.... पूजा पारखींनी तणावमुक्तीचा मार्ग त्यांच्या परीनं शोधलाय.