चंद्रपूर : येथे ६५ लाख रुपयांचा मोहफूलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर पोलिसांनी सावली तालुक्यातील किसाननगरच्या जंगलात राबवलेल्या विशेष मोहिमेत हा साठा जप्त करण्यात आलाय.
या भागात हातभट्टीच्या दारुसाठी अवैध मोहफूलाची साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या विशेष पथकानं या जंगलात खास अभियान राबवले.
या मोहिमेत ५ मोठ्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. तर ३२ हजार २०० लिटर मोहफूल सडवा जप्त करण्यात आला. या साहित्याची एकूण किंमत ६४ लाख ४० हजार रुपये इतकी होती. या कारवाईमुळे अवैध दारु व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.