चंद्रपूर : चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाकाळात दारूबंदी विषयाला फोडणी दिल्याचे पाहायला मिळतंय. इथली दारुबंदी उठवावी यासाठी त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. गेल्या ५ वर्षात दारूबंदीमुळे अवैध दारू विक्री-बनावट दारूने मृत्यू ओढविल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
ही बाब वडेट्टीवार वळसे पाटलांच्या निदर्शनास आणून दिली आहे. दारुबंदी काळात गुन्हेगारीत वाढ झाल्याची कबुली देखील त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे अत्यंत तातडीने 2 सप्टेंबर रोजी मंत्री दालनात संबंधितांची बैठक बोलावण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केलीय.
दारुबंदी आंदोलकांनी मागणीला याला कडाडून विरोध केलाय. दारु तस्करीला सध्या राजाश्रय असल्याचे दारूबंदी समर्थक नेते एड. चटप यांनी सांगितले.
दरम्यान शहरात लॉकडाउनची पालकमंत्र्यांनी केलेली घोषणा बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत केंद्र सरकारने अनलॉक ४ च्या जाहीर केलेल्या नियमावलीत कुठल्याही शहरात लॉकडाऊन नको अशी केली आहे. प्रशासनाने ८ दिवसांचा लॉकडाऊन २ टप्प्यात अंमलात आणण्याची तयारी इथे सुरु होती. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या २०७४ इतकी झालीय.
सर्वाधिक कोरोना बाधित हे चंद्रपूर शहरात आहेत. कोरोना डब्लींग रेट संथ करणे आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन उचलणार महत्वाची पाऊल उचलण्याच्या तयारीत होते. मात्र केंद्र सरकारने संमतीशिवाय अगदी खेड्यातही लॉकडाऊन नको अशी सूचना आता आली आहे.