चंद्पुरात काँग्रेसचे २ गट, २ वेगवेगळे मेळावे

ज्यातील दिग्गज काँग्रेस नेते सहभागी होण्याचा दावा केला जात आहे. दोन्ही कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे .

Updated: Nov 6, 2017, 03:02 PM IST

चंद्रपूर : सत्ताधारी भाजप सरकारचे अपयश जनतेपुढे आणण्यासाठी राज्य काँगेसने विभागीय स्तरावर जनआक्रोश मेळावे घेण्याचे निश्चित केले आहे. नागपूर विभागाचा मेळावा आज चंद्रपुरात होत आहे.  मात्र २ गटात विभागलेल्या काँग्रेस पक्षाने भाजपला सुखावण्याचे क्षण दिले आहेत. 

काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या आयोजनात एक मेळावा शहरातील चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आलाय. तर वडेट्टीवार यांचे नेतृत्व धुडकावून माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शहरात वेगळी रॅली आणि मेळावा घेण्याचे ठरविले आहे. 

दोन्ही मेळाव्याना केंद्र आणि राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते सहभागी होण्याचा दावा केला जात आहे. दोन्ही कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे .