Chandrakant patil: पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आलेले राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Attack On Chandrakant patil) यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. त्यानंतर पुण्यात एकच खळबळ (Maharastra Politics) उडाल्याचं पहायला मिळतंय. त्यानंतर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. त्यानंतर आता भाजप आमदार राम कदम यांनी खुली धमकी दिल्याचं पहायला मिळतंय. (chandrakant patil news ink throwing in pimpri chinchwad pune ram kadam aggresive marathi news)
आयुष्यभर त्यागपुर्ण आणि समर्पित जीवन आयुष्यभर जगणारे आमचे चंद्रकांतदादा यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शडयंत्र आखून भ्याड शाहीचा (chandrakant patil ink throw) हल्ला केला. चंद्रकांतदादा बोलले ते ऐकून तुम्ही लोकांची दिशाभूल करता. दादा कोणतेही गैर बोललेले नाहीत. ही मांडण्याची पद्धत आहे का?, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केलाय.
आणखी वाचा - आताची मोठी बातमी! पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, फुले-आंबेडकर वक्तव्याचा वाद
सरकार गेल्यापासून तुमचे वसूलीचे धंदे बंद झालेत. बदल्यांचे पैसे आणि कॅन्ट्रॉक्टरचे पैसे बंद झालेत. तुमची हतबलता तुमच्या भ्याड हल्ल्यातून दिसून येते. शाही हल्ला करणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर कसं देयचं, हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलं माहीती आहे. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा मान राखतो, म्हणून आम्ही कायदा हातात घेत नाही. पण विरोधी पक्षाने आमचा अंत पाहू नये. तसेच हात जोडून विरोधकांनी चंद्रकांत पाटलांची माफी मागावी, अशी मागणी देखील राम कदम (Ram kadam) यांनी केली आहे.
दरम्यान, शाईफेक करणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी (Pune police) ताब्यात घेतलंय. चंद्रकांत पाटील महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर ही शाईफेक (Ink Attack On chandrakant Patil) करण्यात आली. यावेळेस चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कालपासून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राज्याभर पडसाद दिसून येत आहेत.