२० हजार कोटींच्या अतिरिक्त कर्जाला केंद्राची राज्याला मंजुरी

राज्य सरकारच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे.

Updated: Sep 19, 2017, 04:20 PM IST
२० हजार कोटींच्या अतिरिक्त कर्जाला केंद्राची राज्याला मंजुरी  title=

मुंबई : राज्य सरकारच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जमर्यादा वाढवण्याची मागणी राज्य सरकारने केली होती.

याआधी केंद्राने ४५ हजार कोटीचं कर्ज उभारण्याची मंजुरी दिली होती. नव्या मंजुरीमुळे राज्याला ६५ हजार कोटींचं कर्ज उभारता येणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर एकूण ४.५ लाख कोटींचा बोजा पडणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.