नवीन वर्षाचे सेलिब्रेशन जीवावर बेतले, अपघातात ३ ठार

जिल्ह्यात न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतत  असतात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मद्यपींनी घाटंजी इथे एका कारच्या काचा देखील फोडल्याची घटना घडली. 

Updated: Jan 1, 2018, 11:34 PM IST
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन जीवावर बेतले, अपघातात ३ ठार title=

यवतमाळ : जिल्ह्यात न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतत  असतात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मद्यपींनी घाटंजी इथे एका कारच्या काचा देखील फोडल्याची घटना घडली. 

बाभूळगाव तालुक्यातील चोंढी फाट्यावर रात्री उशिरा अल्टो कारचा भीषण अपघात झाला. यात यवतमाळच्या उज्वल नगरात राहणारे गौरव संजय सपाटेव राहुल अशोक बोराडे हे दोघे तरुण जागीच ठार झाले तर विशाल लक्ष्मणराव काळे असे जखमी तरुणाचं नाव आहे. 

हे तिघेही बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे नववर्षाची पार्टी करण्यासाठी गेले होते. तेथून कारने घराकडे परत येत असताना चोंढीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. तर घाटंजी येथे मोटारसायकलस्वार तरुणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने सुनील आत्राम हा तरुण ठार झाला तर आदर्श उईके हा जखमी झाला. कान्होबा टेकडी जवळ हा अपघात झाला.