अलिबाग : खोपोलीजवळ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात झाला. एका कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात एक जणा जागीच ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झालेत. तर ट्रकमधील चालक आणि क्लिनरही जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव रणवीर चव्हाण असून, ते कोल्हापूर जिल्हा बँकेचे अधिकारी आहेत.
#BreakingNews । खोपोलीजवळ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक. अपघातात एक जण जागीच ठार. दोन जण गंभीर जखमी.https://t.co/PaUhqUF2ly pic.twitter.com/46rrpi8Tlr
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 3, 2020
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेत साखर कारखाना कर्जपुरवठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण हे मूळचे सांगलीचे आहेत. त्यांच्यासोबत आणखी दोघे जण होते. ते जखमी झाले आहेत. रणवीर हे रात्री खासगी गाडीने मुंबईला निघाले होते. साखर कारखान्याच्या कर्जाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आज त्यांची मंत्रालयात बैठक होती. त्यासाठी ते प्रस्ताव घेऊन मुंबईला निघाले होते. त्यांच्या कारला ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात ते ठार झालेत. ते मनमिळावू अधिकारी होते, अशी माहिती मिळत होते. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.
0