शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

Car accident of Shiv Sainiks Death: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. 

Updated: Oct 24, 2023, 11:55 AM IST
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू  title=

Ratnagiri Nagpur Accident: दसऱ्याच्या दिवशी आज राजकीय आखाडा पाहायला मिळणार आहे.. कारण दस-यानिमित्त मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय मेळाव्यांचा झंझावात पाहायला मिळेल.दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली.

ट्रकने पदाधिकाऱ्याच्या गाडीला मागून धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.  शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आले आहे.

 मुंबईच्या ऐतिहासिक  शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडेल.. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी शिवाजी पार्कवरचे दसरा मेळावा गाजले.. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्याच आझाद मैदानावर होणार आहे.

मुंबईत वाहनांची गर्दी

दोन्ही मेळाव्यासाठी हजारो वाहने मुंबईत दाखल होत आहेत. या दसरा मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून 5200 हून अधिक बसेसमधून शिवसैनिक येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आली. 

सुमारे 8-10 हजार शिवसैनिक छोट्या चारचाकी वाहनातून रॅलीला येणार आहेत. हा आकडा जास्तही असू शकतो. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी बाहेरून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी वाशी, मुलुंड, पडघा, दहिसर चेक पॉइंटवर चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

याशिवाय आझाद मैदानाच्या काठावरील मैदानातही व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणातून बसने येणारे शिवसैनिक बॅलार्ड इस्टेट येथे उतरणार असून त्यांच्या बसेस जीआरपी आयुक्त कार्यालय रोड, कर्णक बंदर येथे पार्किंग देण्यात आल्या आहेत.