जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवाराचं रांगोळी काढून मतदान करण्याचं आवाहन

निवडणुकीसाठी असाही अनोखा प्रचार

Updated: Oct 15, 2019, 11:02 PM IST
जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवाराचं रांगोळी काढून मतदान करण्याचं आवाहन  title=
प्रतिकात्मक फोटो

हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : आजकाल सर्वच पक्षाचे उमेदवार निवडणुकीत डिजिटल प्रचार तंत्र वापरताना दिसत आहेत. निवडणुका म्हटलं की गाडया. लाऊडस्पीकर, झेंडे, टोप्या, फेटे, गायक, वादकांचा ताफा, जेवणाच्या पंगती, डिजिटल स्क्रिनच्या व्हॅन आल्याच. पण आपण जी बातमी पाहाणार आहोत या उमेदाराकडे यापैकी कोणतेही तंत्र नाही. आशा तोतरे जुन्नर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभ्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या फक्त १० ते १२ रुपयांची रांगोळी वापरत आहेत. 

गावोगावी जाऊन, तिथल्या बस स्थानकावर रांगोळी काढून आपल्याला मतदान करण्याचं आवाहन अपक्ष उमेदवार आशा तोतरे मतदारांना करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे सुरु असलेल्या वेगळ्या प्रचाराची जुन्नरमध्ये चांगलीच चर्चा आहे.