भाडेकरू म्हणून आला, तिचा मालक बनायला गेला... आणि पुढे

गुलाम शेख हा तरुण भाडेकरू म्हणून रहायला आला. घर मालकीण आणि गुलाम यांच्यात ओळख वाढली. थट्टा मस्करी सुरु झाली आणि ती त्याच्या प्रेमाची गुलाम झाली.   

Updated: Feb 9, 2022, 07:07 PM IST
भाडेकरू म्हणून आला, तिचा मालक बनायला गेला... आणि पुढे title=

पुणे : भाडेकरू म्हणून घरात राहायला आलेल्या तरुणाचे घर मालकीणीशीच प्रेमसंबंध जुळले. त्यांचे ते संबंध उघडकीस आले. घरमालकिणीच्या घरच्यांनी त्याला घर खाली करायला लावले. मग, तिनेही त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. त्या तरुणाचा प्रेमभंग झाला आणि त्यांच्यात वाद झाला.

पुण्याच्या लोहगाव येथील मोझेआळी परिसरात ही घरमालकीण आपला पती आणि मुलांसह राहत होती. आपल्या घरातील एक बाजू तिला भाड्याने द्यायची होती. काही दिवसांनी गुलाम शेख हा तरुण तिथे भाडेकरू म्हणून रहायला आला. घर मालकीण आणि गुलाम यांच्यात ओळख वाढली. थट्टा मस्करी सुरु झाली. आणि ती त्याच्या प्रेमाची गुलाम झाली. 

त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अनेकदा त्यांनी प्रेमाची मर्यादा पार केली. मात्र, त्यांच्या मर्यादेला आळा बसला. कारण, त्यांचे हे प्रकरण तिच्या घरच्यांना  कळल्यामुळे. त्यांनी गुलामाला घर खाली करण्यास सांगितले. त्यानेही घर खाली केले. पण, अधूनमधून तो तिच्या घरी येऊ लागला. मात्र, आता ती त्याला टाळू लागली होती.

तिने गुलामसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा त्याला राग येऊ लागला. अखेर त्याने ती निर्णय घेतला. रविवारचा दिवस.. त्या महिलेचा पती मुलांना घेऊन बाहेर गेला होता. ही संधी साधून त्याने तिचे घर गाठले. आतून खोली बंद केली आणि बाथरूमध्ये नेऊन त्यांचे गळा आवळून तिचा खून केला.

त्या महिलेचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह बाथरूममध्ये टाकला. घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो फरार झाला. महिलेचा पती, मुले सायंकाळी परत आल्यावर त्यांना बाहेरून कुलूप दिसले. त्यांनी पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर त्यांनी रात्री उशिरा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. अन समोरचे दृश्य पाहून त्यांनी थेट पोलिसांना संपर्क केला. पोलीस ठाणे गाठले.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनस्थळ गाठले. मृत महिलेच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी गुलाम शेख यांच्याविरोधात गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले आहे.