पुणे : पुण्यात पहिल्यांदाच केक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लेडीज असोसिएशनच्या वतीनं होम मेकर्स महिलांना प्रोत्साहीत करण्यासाठी, ही स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत २४ महिलांनी सहभाग घेतला. तीन किलोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक डिझाईन केलेले केक स्पर्धक महिलांनी सादर केले.
शिवाजी महाराजांचा गिरीकंद किल्ला, सांताक्लॉज, बार्बी डॉल, हातावरची मेहंदी, महिलांचे दागिने आणि त्याचा ज्वेलरी बॉक्स, असे नानाविध प्रकारचे केक महिलांनी तयार केले. हे आकर्षक केक तेवढेच स्वादिष्टही होते.