संतापलेल्या प्रवाशाची महिला कंडक्टरला मारहाण

एसटी बसमध्ये गर्दी असल्याने तिकीट काढण्यासाठी बाजूला होण्यास सांगितल्याने संतापलेल्या प्रवाशाने महिला कंडकटरला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल करण्यात पोलिसांनी इम्तियाज हाश्मीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

Updated: Jul 1, 2017, 07:14 PM IST
संतापलेल्या प्रवाशाची महिला कंडक्टरला मारहाण title=

कल्याण : एसटी बसमध्ये गर्दी असल्याने तिकीट काढण्यासाठी बाजूला होण्यास सांगितल्याने संतापलेल्या प्रवाशाने महिला कंडकटरला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल करण्यात पोलिसांनी इम्तियाज हाश्मीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

कल्याण एसटी डेपोहुन दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कल्याण भिवंडी एसटी निघाली. त्यावेळी बसचालक सुधाकर गंगावणे आणि महिला कंडक्टर सिमीलता खांदे बसमध्ये होते. 

बस लाल चौकीत पोहोचल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पुढे जाण्यासाठी खांदे यांनी हाश्मीला बाजू देण्यास सांगितले, मात्र याचा राग येऊन हाश्मीने खांदे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान एसटी कंडकटर आणि चालकाला मारहाण करण्याच्या घटना वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच प्रश्न ऐरणीवर आला आहे.