तुकोबांच्या पालखीला 'सर्जा-राजा'ची खिल्लारी बैलजोडी!

यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला ओढण्याचा मान खेड तालुक्यातल्या चिंबळी मधल्या अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला आणि हवेली तालुक्यातल्या लोहगावच्या भानुदास भगवान खांदवे यांच्या 'सर्जा-राजा' या बैलजोडीला मिळालाय. बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल १८ बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थांकडे अर्ज सादर केले होते.

Updated: May 31, 2017, 03:44 PM IST
तुकोबांच्या पालखीला 'सर्जा-राजा'ची खिल्लारी बैलजोडी! title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला ओढण्याचा मान खेड तालुक्यातल्या चिंबळी मधल्या अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला आणि हवेली तालुक्यातल्या लोहगावच्या भानुदास भगवान खांदवे यांच्या 'सर्जा-राजा' या बैलजोडीला मिळालाय. बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल १८ बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थांकडे अर्ज सादर केले होते.

माणिक राजा आणि सर्जाराजाची ही सुंदर बैलजोडी... यावर्षी जगदगुरू संत तुकोबारायाच्या पालखीला ही बैल जोडी खेचणार आहे. विश्वस्त मंडळाकडे यासंदर्भात १८ मालकांकडून बैल जोड्यांचे प्रस्ताव आले होते. विश्वस्त मंडळाने पाहणी केल्यावर खेड तालुक्यातल्या चिंबळीमधल्या आप्पासाहेब लोखंडे आणि लोहगावच्या भानूदास खांदवे यांच्या बैलजोडीला मिळाला. 

निवड प्रक्रिया साधी सोपी नसते... जोडी पालखीच्या रथाला शोभली पाहीजे, रथ ओढण्याची क्षमता पाहीली जाते. डौलदारपणा, रंग, शेपटी, पायाच्या खुरांची तपासणी करण्यात येते. प्रत्यक्ष रानात नेऊन या बैलजोडीला जुंपण्यात येतं. त्यांच्यापाठीवर वजन बांधून त्यांच्या चालण्याची पाहणी करण्यात येते. त्यानंतर पशूवैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिल्यावर या बैल जोडीला मान बहाल करण्यात येतो.

यावर्षी १६ जूनला तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान आहे. यावर्षी एकूण ३३१ नोंदणीकृत दिंड्या वारीत असणार आहेत. वारकऱ्यांना आता वेध लागलेत ते आनंदवारीचे...