मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा: बुलढाण्याला लागूनच असलेल घाटा खाली कोऱ्हाळा बाजार नावाचं गाव आहे. गावगावात जायला एकेरी रस्ता पण जिल्हा परिषदेची या ठिकाणी इयत्ता आठवीपर्यंत डिजिटल शाळा आहे
या डिजिटल शाळेत विद्यार्थ्यांमध्ये अमरदीप बावणे देखील शिकतोय. शिक्षकांना विचारलं की हा विद्यार्थी एवढा नीटनेटका व्यवस्थित कसा काय दिसतो. शिक्षकांचे उत्तर होतं तो नीटनेटका व्यवस्थित तर आहेच परंतु तो एका मोठ्या आजाराने सुद्धा ग्रस्त आहे आणि तुम्ही त्याला फक्त एकदा त्याच्या आजाराविषयी माहिती विचारा तो काय म्हणतो.
अमरदीप बावणे असं त्याचं नाव असून त्याला थॅलेसेमिया मेजर नावाचा मोठा आजार आहे. या आजारामुळे त्याला दर आठ ते पंधरा दिवसाला शरीरातील रक्त बदलावं लागतं. तो स्वत: संपूर्ण ट्रीटमेंटची माहिती त्याची तोंडपाठ आहे हे ऐकूनच नवल वाटतं कारण जेवढं त्याचं वय आहे त्याहीपेक्षा अधिक त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अमरदिपला कलेक्टर व्हायचं म्हणतो.
सिकल सेल, अॅनेमिया हे बरे होऊ शकतात. पण थॅलेसिमियी मेजर बरा होत नाही. याने लोक मरु शकतात.यावर उपचार करण्याचे माझे वय निघून गेले असल्याचे अमरदिप सांगतो.
आठ दिवसांनी बुलढाण्याला जाऊन रक्त घ्याव लागतं. दरवेळेस रक्त उपलब्ध असतच असं नाही, असेही तो सांगतो.
रक्त बदललं नाही तर अंगावर सूज येते, अशक्तपणा येतो, कोणत्याच कामात चित्त लागत नाही, असेही तो सांगतो.
मी आता दवाखान्यात जातो, सर्व डॉक्टर मला ओळखतात. ते आई-वडिलांशी बोलतात, त्यातून मला आजाराबद्दल कळत गेल्याचे त्याने सांगितले.
आठवड्याला रक्त लागतं, तिथे दवाखान्यात रक्त नसेल तर बाबा रक्त देतात.ए पॉझिटीव्ह रक्तगट फारसा उपलब्ध नाही, त्यामुळे फार अडचण येते, अशी खंतही तो व्यक्त करतो.
अमरदीप बावणेची आई शेतात मजुरी करते तर बाबा घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचवण्याचं काम करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि दुर्धर आजार असूनही त्याची जिद्द आणि चिकाटी कमालीची आहे.
तो एका छोट्याशा खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे, असं त्याच्याशी बोलताना अजिबात भासणार नाही.
अमरदीप बावणेसारखे असंख्य विद्यार्थी देशात आहेत. ते परिस्थितीला भिडतात आणि इतरांना जगण्याची प्रेरणा देतात.