मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

Samruddhi Highway : उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहेत. रविवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता

Updated: Mar 12, 2023, 10:30 AM IST
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार title=

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गावर (samruddhi Highway) अपघातांची मालिका अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत अनेकांनी या महामार्गावर अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. रविवारी बुलढाण्याजवळील (buldhana news) सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू घटना घडली आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अर्टिका गाडीला झालेल्या अपघात दोन लहान मुलांसह तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे.

कसा झाला अपघात?

या भीषण अपघातात दोन मुले आणि तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. दूरचा प्रवास करताना हायवे हिपनॉसिस (Highway hypnosis) नावाचा प्रकार होता आणि झोप लागते. त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या महामार्गावर झालेले अपघात हे झोपेच्या कारणामुळेच झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी पोलिसांनी पोहोचण्यासाठी देखील वेळ लागत आहे. सकाळी 3 ते 4 दरम्यान हा अपघात झाल्यानंतर महामार्गावर दूरपर्यंत मदत केंद्र उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, 701 किलोमीटर लांबीचा नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग गेल्या काही दिवसांपासून अपघातांमुळेच चर्चेत आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. राज्याच्या 10 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर असल्यामुळे गाड्यांवरील नियंत्रण सुटल्याने हे भीषण अपघात होत आहेत.

दुसरीकडे, शुक्रवारी समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.  धामणगाव तालुक्यात शेंदुरजनाजवळ भरधाव ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे दोन तुकडेच झाले होते. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे समृध्दी महामार्गावरील पुलावरुन ट्रक थेट खाली कोसळला होता. हा भरधाव वेगाने जाणारा ट्रक नागपूरहून मुंबईकडे जात होता. मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.