विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंती दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

Updated: Sep 22, 2017, 01:15 PM IST
विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न title=

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंती दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

'मल्हार क्रांती' या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय. यावेळी मारुती जानकर यांना ताब्यात घेण्यात आलंय.

धनगर समाजास आरक्षण आणि सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याची मागणी या संघटनेनं केलीय.