BREAKING : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

राज्यात सत्ता संघर्षाचा खेळ सुरु असताना आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.

Updated: Jun 25, 2022, 10:30 PM IST
BREAKING : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता title=

मुंबई : राज्याच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ले होत आहेत. जर असं चित्र कायम राहिलं तर राष्ट्रपती राजवट लावण्याचा राज्यपाल विचार करु शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप आला आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 50 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार धोक्यात आलं आहे.

ठाकरे सरकार वाचवण्यासाठी खलबतं सुरु आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. काल रात्री ही भेट झाली. याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली. 

एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याबाबत राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यातच आता राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली जात आहे.

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. अनेक ठिकाणी आमदारांचे बॅनरजी फाडण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी त्यांच्या फोटोला काळीमा फासण्यात आलं आहे.

शिंदे गटाकडून आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दीपक केसरकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.