पुणे : कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याच्या निमित्ताने उद्भवलेल्या वादाचे गुऱ्हाळ अजून सुरुच आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवरून ब्राह्मण महासंघातच फूट पडली आहे. ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन ब्राह्मण उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी प्रतिक्रिया, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिली.
महासंघाचे इतर पदाधिकारी मात्र या भूमिकेशी सहमत नाहीत. चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीचा विषय मिटला असून, त्यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटले आहे.