चाकणमध्ये घरात स्फोट; एकाचा मृत्यू

राहत्या घरात स्फोट

Updated: Jun 27, 2019, 04:35 PM IST
चाकणमध्ये घरात स्फोट; एकाचा मृत्यू title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : चाकणजवळील खराबवाडीत एका घरात अचानक पहाटेच्या सुमारास स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यु झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे.  स्फोटाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

घरात झालेल्या  स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मांगीलाल चौधरी असे आहे. आज पहाटेच्या सुमारास खराबवाडी येथील महादेव मंदिराजवळ मांगीलाल चौधरी राहात असलेल्या घराचा दरवाजा उघडल्यानंतर अचानक  स्फोट झाला. यात मांगीलाल यांचा जागीच मृत्यू झाला. स्पोटाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून गॅस सिलेंडरचा स्पोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. राहत्या घरात अचानक स्पोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.