मीरा-भाईंदर : दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या विजयाची घोडदौड अजूनही कायम आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकांमध्येही भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मीरा-भाईंदरच्या निकालानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीका केली आहे.
मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले..पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपचा दणदणीत विजय करून स्विकारले! मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन! मुंबईत दमछाक, पालघर,कल्याण-डोंबिवलीत अडले, पनवेलमधे भोपळा एमएमआरमधे पाचव्यांदा मतदारांनी उघडा केला "काहींच्या" ताकदीचा अस्सली चेहरा! असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
मिरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले..पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपचा दणदणीत विजय करून स्विकारले! मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन! !
— ashish shelar (@ShelarAshish) August 21, 2017
मुंबईत दमछाक, पालघर,कल्याण-डोंबिवलीत अडले, पनवेलमधे भोपळा एमएमआरमधे पाचव्यांदा मतदारांनी उघडा केला "काहींच्या" ताकदीचा अस्सली चेहरा!
— ashish shelar (@ShelarAshish) August 21, 2017
मीरा-भाईंदरमध्ये भाजपचा विजय झाला आहे आणि शिवसेनेचा दारूण पराभव झाला आहे. आता तरी बांद्रा सुप्रीमो वास्तविकता स्वीकारतील आणि मुख्यमंत्री-पंतप्रधानांना मान देतील, असं ट्विट किरीट सोमय्यांनी केलं आहे.
BJP sweeps #MiraBhayander Municipal Election-Disaster of #ShivSena hope now BandraSupremo will accept Reality & Respect PM Modi CM Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 21, 2017
मिरा भायन्दर निवडणूक भाजपा भव्य विजय शिवसेना दारुण पराभव आत्ता बांद्रा सुप्रीमो वास्तविकता स्वीकारणार प्रधानमंत्री मुख्यमंत्री चे मान राखणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 21, 2017