आमदार नितेश राणे यांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज, आजच सुनावणी

 Nitesh Rane case : भाजप आमदार नितेश राणे यांना दिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकीलामार्फत तात्काळ  जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  

Updated: Feb 5, 2022, 12:00 PM IST
आमदार नितेश राणे यांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज, आजच सुनावणी  title=

मुंबई : Nitesh Rane case : भाजप आमदार नितेश राणे आणि राकेश परब यांना दिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकीलामार्फत तात्काळ उरुस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दोघांचेही स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आता आमदार नितेश राणे यांना आज न्यायालयीन कोठडी मिळणार की सुटका होणार याबद्दल सिंधुदुर्गमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

अर्जाबाबत पोलिसांना आज म्हणणे मांडण्यास सांगितले गेले आहे. या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे. जिल्हा सत्र न्यायालय काय आदेश देणार याची उत्सुकता आहे. तसेच पोलीस जिल्हा सत्र न्यायालयात काय आपले काय म्हणणे मांडतात याकडेही लक्ष लागणार आहे. त्यामुळे जेल की बेल ते दुपारी कळणार आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, सरकारी वकिलांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. काल एक दिवसांची वाढ करत 5 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

त्याआधी पोलिसांनी याप्रकरणी तपास अहवाल न्यायालयात सादर केला. नितेश राणे यांचा थेट सहभाग गुन्ह्यात आहे, असे म्हणणं पोलिसांनी मांडले आहे. त्यांना कोठडी मिळाल्यानंतर नितेश राणे यांना घेऊन पोलीस गोव्यात गेले होते. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. 

दरम्यान, नितेश राणे यांना अटक केल्यानंतर कणकवली दिवाणी न्यायालयाबाहेर नितेश राणे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणाव जमले  होते. त्यांनी गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. न्यायालय आवारात गोंधळ घातल्याने आणि जमाव केल्याप्रकरणी जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानंतर माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.