एनसीडीसीनं दिलेल्या कर्जाचं पुर्नगठन करावं - हर्षवर्धन पाटील

शेतक-यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी दिसतेय

Updated: Dec 19, 2020, 01:26 PM IST
एनसीडीसीनं दिलेल्या कर्जाचं पुर्नगठन करावं - हर्षवर्धन पाटील  title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : साखर कारखान्यांना एनसीडीसीनं दिलेल्या कर्जाचं पुर्नगठन करावं अशी मागणी भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. याच मुद्द्याला आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची उचलून धरलं. या मागणीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय झालं? कोणत्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली? या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी झी २४ तासला विशेष मुलाखत दिली. 

हर्षवर्धन पाटील यांच्या चर्चेतील महत्वाचे मुद्दे 

- एनसीडीसीनं दिलेल्या कर्जाचं पुर्नगठन करावं.
- ६०-६५ कारखाने एनपीएमध्ये जाऊ शकतात.
- एकदा एनपीएमध्ये गेले तर पुन्हा कारखान्यांना कर्ज मिळणार नाही.
- एमएसपी ३४०० रूपये करावी. आत्ता एमएसपी ३१०० रूपये आहे.

- यावर्षी ऊसाचं विक्रमी गाळप होईल.
- एनसीडीसीनं दिलेले कर्ज कारखान्यांनी वेळेत फेडलं नाही.
- या कर्जाचे पुर्नगठन करा. पुढील वर्षी ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
- शेतक-यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी दिसतेय. म्हणून राजू शेट्टी आणि बच्चू कडू आंदोलनात उतरले असा टोमणा हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.