विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन

 विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये साई बाबांचं दर्शन घेतलं 

Updated: Dec 18, 2021, 01:34 PM IST
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन title=

शिर्डी : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये साई बाबांचं दर्शन घेतलं आहे. महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी साई बाबांचं दर्शन घेतलं. तर अमित शाह यांचा शिर्डी दौरा लांबणीवर पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकार परीषदेनंतर साई बाबांचं दर्शन घेणार आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या ( रविवार) एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पुणे महापालिकेत आयोजित कार्यक्रमात दोघांची उपस्थिती असणार आहे.

महापालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। त्याचं भुमिपूजन उद्या होणार आहे.  त्याचप्रमाणे महापालिकेच्या नवीन इमारतीत  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला त्याचं अनावरण होणार आहे.  दोन्ही कार्यक्रम अमित शहा यांच्या हस्ते होणार आहेत.

अमित शाह आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर असणार आहेत. त्यामुळे सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. महापालिकेत होऊ घातलेल्या निवडणुकांची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे शहर भाजप कार्यालयाचे उदघाटन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. आगामी महापालिका निकडणुकीच रणशिंग त्या कार्यक्रमात फुंकलं गेलं. आता अमित शाहांच्या कार्यक्रमात निवडणुकीचा नारळ फुटणार असल्याची चर्चा आहे.