यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा

आठ वर्ष जुनं प्रकरण    

Updated: Oct 15, 2020, 09:21 PM IST
यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा title=

अमरावती : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावतीच्या राजापेठ परिसरात यशोमती यांची गाडी एका पोलीसाने आडवली होती. त्यामुळे संतप्त यशोमती ठाकूर आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीसाला मारहाण केली होती. या प्रकरणी अमरावती न्यायालयाने तिघांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. 

त्यामुळे आता भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या म्हणाल्या, 'याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता एका महिलेमागे संपूर्ण भाजप लागणार. भाजप आणि आमच्यात विचारांची लढाई आहे. पण त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी विचारांची लढाई आम्ही लढत राहणार.'

असं म्हणत माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळणार असा विश्सास देखील त्यांनी याठिकाणी व्यक्त केला. दरम्यान, अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.