डोंबिवली : भिवंडी-वाडा रोडवर गोळीबार करून व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला ठाणे ग्रामिण पोलिसांनी गजाआड केलं आहे. अटकेमध्ये असलेल्या या आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवलीतील भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा या आरोपींनी केला आहे.
हत्येच्या सुपारीसाठी ११ लाख रुपये अॅडव्हान्सही घेण्यात आले होते. डोंबिवलीमधील एका बाहुबली नगरसेवकानंच कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान कुणाल पाटील यांच्यावरही एका नगरसेवकाची सुपारी दिल्याचा आरोप आहे.