भाजप मेळाव्यातील वाद घरातील भांडण - अर्जुन खोतकर

'अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे.'

Updated: Apr 11, 2019, 10:48 PM IST

अमळनेर मारहाण : उदय वाघ यांच्याविरोधात दंगलीचा तर बी. एस. पाटलांविरुद्ध एट्रोसिटीचा गुन्हा

जळगाव :  अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे, तो लवकरच संपेल असे महायुतीचे मराठवाडा समन्वयक आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. ते महायुतीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते. यावेळी आमदार संतोष दानवे हे उपस्थित होते. येत्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांच्या यादीत रावसाहेब दानवे असतील असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला आहे. 

काय ही दयनीय अवस्था, गुंडांची मांदियाळी भाजपमध्ये - काँग्रेस

राजूर येथील गणपतीची पूजा करून खोतकर यांनी हा प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी महायुतीचे दाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ज्या ज्या वेळी आम्ही राजुरेश्वरकडे यश मागितले त्या त्या वेळी राजुरेश्वराने आम्हाला यश दिलेले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्हाला यश मिळणारच असून देशातील सर्वात जास्त मताने निवडून येणाऱ्या उमेदवारात रावसाहेब दानवे, असतील असाही विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला.