नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या दोन शहरांमधल्या मेट्रोबद्दल मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. नागपूर आणि नाशिकमधल्या मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात या शहरांमधलं मेट्रोचं जाळं आणखी भक्कम करण्यात येणार आहे.
नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केलेल्या या घोषणेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी म्हटलं की, अभिनंदन नाशिक! अभिनंदन नागपूर!, आम्हाला आनंद आहे की भारत सरकारने आमच्या अभिनव दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे आणि नाशिक मेट्रोच्या मॉडेलला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्वीकारले आहे. इतकेच नव्हे तर इतर मेट्रो शहरांमध्येही नाशिक मेट्रो मॉडेल राबविण्यात येणार आहे.
Interacting with media on #AatmanirbharBharatKaBudget#BudgetOfHope
https://t.co/WoQyS2KXq2— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2021
दुसरीकडे भारतीय रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. भारत सरकार 2030 पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणारेय. तर 2023 पर्यंत ब्रॉडग्रेजचं शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.