दिंडोरी : भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा विजय झाला आहे. हा विजय अनेकांसाठी धक्का समजला जात आहे.
या मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपकडून हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवडणूक जिंकली होती. ते लागोपाठ ३ वेळा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. पण भाजपने त्यांचा पत्ता कापत डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी दिली होती. वंचित बहुजन आघाडीने बापु बर्डे यांना मैदानात उतरवलं होतं.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हरिशचंद्र चव्हाण यांना ५,४२,७८४ मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना २,९५,१६५ तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना ७२,५९९ बसपाच्या शरद माळी यांना १७,७२४, आपच्या ज्ञानेश्वरी माळी यांना ४,०६७ मते मिळाली होती.