पुणे : पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युटची तोडफोड केल्याचा आरोप असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या सर्वच्या सर्व ७२ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झालीय. तेरा वर्षांपूर्वी ५ जानेवारी २००४ ला भांडारकर प्राचविद्या संशोधन संस्थेवर हल्ला झाला होता.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून इन्स्टिट्यूटची तोडफोड केल्याचा आरोप होता. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण करणा-या जेम्स लेनला भांडारकर संस्थेतील १२ जणांनी मदत केल्याचा संभाजी ब्रिगेडचा आक्षेप होता. त्याच वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं.
हा खटला सुरु असतानाच्या कालावधीत ७२ पैकी चार आरोपींचा मृत्यू झाला. पण भांडारकर संस्थेवरील हल्ला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनीच केला होता, हे सरकार पक्ष न्यायालयात सिद्ध करु शकला नाही, असं कारण देत पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सर्वांची निर्दोष मुक्तता केली.