ऑनलाईन खरेदी करणं पडलं महागात

Updated: May 18, 2018, 09:59 PM IST

मुंबई : ऑनलाईन खरेदी करताना सावधान... ओएलएक्स वेबसाईटवर गाडी खरेदी करणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. शैलेश येलमामे... नाशिकमध्ये टुरीस्ट व्हेईकलचा व्यवसाय करतात. त्यांना इनोव्हा गाडी घ्यायची होती. ओएलएक्सवर त्यांनी शोध घेतला. एमएच १२ केवाय ३६६१ ही गाडी त्यांना पसंत पडली. गाडीची मालकी असलेल्या महिलेने इमेलद्वारे चार लाखांची मागणी केली. गाडी पुण्यात एअर इंडिया लॉजिस्टीक्स पार्कींगमध्ये उभी आहे. आम्ही अमेरिकेत राहात आहोत. पैसे भरा आणि पार्कींगचे पैसे भरून गाडी घेऊन जा असं या महिलेनं त्यांना सांगितलं. येलमामे यांनी पैसे ट्रान्सफर केल्यावर  त्या महिलेला फोन केला.  त्यावर आम्ही तुम्हाला ओळखत नाही असं सांगत त्या महिलेने फोन कट केला. 

नाशिकमध्ये तरूणाची झालेली ही फसवणूक अनेकांना धडा देणारी आहे. ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहा हीच अपेक्षा.