प्रताप नाईक; प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं कमी होत चाललीये. सध्या राधानगरी धरणात केवळ १.४५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील एक शाहुकालीन वास्तू पर्यटकांसाठी खुली झालीय.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उभी असलेला 'बेनजर व्हिला'... कोल्हापूर संस्थानमधील जनतेची तहान भागावी या उद्देशानं छत्रपती शाहु महाराजांनी राधानगरी धरण बांधलं... हे धरण उभारताना महाराजांनी स्वत: या कामावर लक्ष ठेवलं. यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक छोटेखानी राजवाडाच उभारण्यात आला... तोच हा बेनजर व्हिला... धरण भरल्यामुळे या वास्तूपर्यंत पोहोचणं अशक्य झालं... पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून धरणाची पाणी पातळी सतत खालावत असल्यानं या वास्तूपर्यंत पोहोचण्याची वाट मोकळी झालीय. त्यामुळे ही वास्तू पहाण्यासाठी पर्यटक गर्दी करु लागलेत.
'बेनजर व्हिला'ची पूर्ण माहिती पुराभिलेखागारात उपलब्ध आहे. मात्र, वास्तूची सध्याची अवस्था पहाता अद्यापही तिचं महत्त्व प्रशासनाला पटलेलं दिसत नाही.