महाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू

सुरेश हुंदरे स्मृती मंचने यासाठी पुढाकार घेतलाय. समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून एकास एक उमेदवार दिला जावा यासाठी प्रयत्न केला जातोय

Updated: Apr 21, 2018, 09:47 PM IST

बेळवगाव : मराठी बांधवात फूट नको यासाठी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र राहावी यासाठी प्रयत्न सुरु झालेत. सुरेश हुंदरे स्मृती मंचने यासाठी पुढाकार घेतलाय. समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून एकास एक उमेदवार दिला जावा यासाठी प्रयत्न केला जातोय. यासाठी आतापर्यंत अनेक बैठका पार पडल्यात. शुक्रवारी रात्रीसुद्धा बेळगावमध्ये सकारात्मक बैठक पार पडली. सीमा प्रश्नाचे अभ्यासक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेतली जातेय. सुरेश हुंदरे स्मृती मंचमधे बेळगांवमधील महत्वाच्या व्यक्तींचा आणि तरुण पीढीचा समावेश आहे. समितीने एका मतदारसंघात एकच उमेदवार द्यावा या साठी हुंदरे विकास मंच आग्रही आहे.