औरंगाबाद : कडक उन्हात अनेकांचे धंदे मंदावत असतात, मात्र या कडक उन्हात यंदा बिअर विक्रीचा विक्रम झालाय. उन्हाळ्यात प्यालावीरांनी थंडी चिल्ड बिअर जवळ केल्याचं दिसतंय.
यंदाच्या उन्हाळ्यात बिअरच्या विक्रीत विक्रमी वाढ झाल्यानं सरकारच्या महसुलात घसघशीत वाढ झाली आहे.
औरंगाबादमध्ये गेल्या वर्षीच्या एप्रिल व मे महिन्याच्या तुलनेत मराठवाड्यातून उत्पादन करणाऱ्या सहा प्रमुख बीअर उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात तब्बल 183 टक्के वाढ केली तर विक्रीमध्ये 252 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.
2020-21 मधील मे महिन्यातील बीअर विक्री 63 लाख लिटर होती, ती या मे महिन्यात तब्बल 248 लाख 45 हजार लिटरवर पोहोचली. टक्केवारीत दोन वर्षांची तुलना केली असता ती तब्बल 294 टक्के भरते.
यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 403 कोटी रुपयांपर्यंत महसूल वाढला आहे. 2020 - 21 मध्ये 50 कोटी 83 लाख रुपयांचा महसूल होता. या वर्षी 453 कोटी 83 लाख रुपयांवर गेला आहे.