शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स; VIDEO VIRAL

 Shiv Jayanti : बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संभाजी महाराज क्रीडा संकुलावर शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी तुफान डान्स केला  

Updated: Feb 20, 2023, 12:20 PM IST
शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स; VIDEO VIRAL title=

Beed News : राज्यासह देशभरात रविवारी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर (Shivneri Fort) मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. बीडमध्येही (Beed) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने (NCP) शिवजयंतीच्या उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी उत्सवात भाग घेतला होता. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स करताना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

बीड शहरातील संभाजी महाराज क्रीडा संकुलावर या शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संदीप क्षीरसागर हे देखील सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तर संदीप क्षीरसागर यांनी देखील मनसोक्त आनंद लुटला.

बीडमधील योगेशपर्व टीमने या उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी 650 ढोल वादक,युक्रेन ,रशिया येथील विदेशी कलाकार,केरळ,पंजाब येथील कलाकारांच्या चित्तथरारक कसरती, भगवे फेटे परिधान केलेल्या हजारो महिला तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम यांच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाऊ कदमने यावेळी महिलांसोबत गप्पा देखील मारल्या.