पुणे : जिल्ह्यातील बारामती शहरातून गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या गणेश भाजी मंडई परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून या व्यवसायाचा पर्दाफाश केला असून एका एजंट महिलेल्या अटक केली आहे.
बारामती पोलिसांना शहरातील मध्यवर्ती परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ सापळा रचत छापा टाकला. रात्री गणेश मार्केटजवळ तीन महिला वेश्या व्यवसायासाठी थांबल्या होत्या.
पोलिसांनी बनावट ग्राहकांना महिलांकडे पाठवले. त्यांच्यातील व्यवहाराचे बोलणे सुरू असताना जवळ साध्या गणवेशात उभ्या असलेल्या पोलिसांनी तेथे एका महिलेला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेली महिला मुळची एरंडोल(जळगाव) येथील असल्याची माहिती मिळाली आहे. त्या महिलेनेही आणखी एका महिलेकडून मिळणाऱ्या कमिशन पोटी हा व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी छापा टाकून या प्रकरणी दोन महिलांनाची सुटका केली आहे. एजंट महिलेकडून मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली असून तिच्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार (Anti human trafficking ) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.