बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरण, मालेगावमधून संशयिताला अटक

नवी मुंबईच्या जुईनगर भागातील बँक ऑफ बडोदामधील दरोडा प्रकरणात मालेगावमधून एका संशयिताला अटक करण्यात आलीये. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 21, 2017, 09:00 PM IST
बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरण, मालेगावमधून संशयिताला अटक title=

मुंबई : नवी मुंबईच्या जुईनगर भागातील बँक ऑफ बडोदामधील दरोडा प्रकरणात मालेगावमधून एका संशयिताला अटक करण्यात आलीये. 

मालेगावमधून सोने विकत घेणाऱ्याला अटक

बँक ऑफ बडोदामधून चोरीला गेलेलं सोनं विकत घेणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी थेट मालेगावातून अटक केलीय. संजय वाघ असं या कारागिरीचं नाव आहे. 

मु्ंबई पोलिसांनी त्याला मालेगावमधून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून अर्धा किलो सोन जप्त करण्यात आलंय. मालेगावच्या छावणी पोलिसात अटकेची नोंद करण्यात आलीय.

मागच्या आठवड्यात घडली होती घटना

गेल्या आठवड्यात जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी जवळपास ३० हून अधिक लॉकर फोडून सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी लुटल्याने एकच खळबळ उडाली.